Pages

महाराष्ट्रातील प्रमुख जलविद्युत केंद्रे



🔹महाराष्ट्रातील प्रमुख जलविद्युत केंद्रे🔹



(१) जायकवाडी प्रकल्प :-

   औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणीजवळ गोदावरी नदीवर राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प
म्हणून ओळखला जाणारा हा जायकवाडी प्रकल्प आहे. या प्रकल्पातून साधारणतः १२००० किलोवॅट इतकी विद्युत निर्मिती होते. धरणाखाली ५ किमी अंतरावर बंधारा उभारून वीजनिर्मिती केली जाते.पाण्याच्या जलाशयाला नाथसागर असे म्हणतात.
-------------------------------------------------------

(२)  कोयना जलविद्युत प्रकल्प :-

       कोयना जलविद्युत केंद्राला महाराष्ट्राची
भाग्यरेषा म्हणून ओळखले जाते. कारण या
जलविद्युत केंद्रावर राज्यातील अनेक उद्योग
व्यवसाय आधारलेले आहेत. कृष्णा नदीची
उपनदी कोयना असून या कोयना जलाशयाला
शिवसागर असे नाव असून या विजेचा वापर
मुंबई,  पुणे येथील औद्योगिक वसाहतीत केला
जातो.
---------------------------------------------------

(३) खोपोली जलविद्युत प्रकल्प  :-

         राज्यातील खोपोली जलविद्युत प्रकल्प
हा मुळा नदीवर महाराष्ट्रातील पहिला जलविद्युत
प्रकल्प असून हा प्रकल्प रायगड जिल्ह्यामध्ये
दिसून येतो. रायगड जिल्ह्यात भिवपुरी व भिरा
येथे जलविद्युत केंद्र असून प्रत्येकी ७०० कि. वॅट
विद्युत क्षमता असलेले हे प्रकल्प आहे.
------------------------------------------------------

(४) येलदरी जलविद्युत प्रकल्प  :-

       मराठवाडय़ातील पूर्णा नदीवर परभणी
जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील येलदरी
गावाजवळ धरण बांधून या धरणाच्या माध्यमातून देखील जवळपास ५००० मेगा वॅट विद्युत तयार केली जाते. यापासून जवळपास मराठवाडय़ातील भागाला वीजपुरवठा झालाआहे.
-------------------------------------------------------

(५) पेंच जलविद्युत प्रकल्प  :-

       नागपूर जिल्ह्य़ात पारशिवनी तालुक्यात
पेंच नदीवर हा प्रकल्प उभारला असून हा
जलविद्युत प्रकल्प उभारण्यात मध्यप्रदेश
सरकारची मदत घेतली आहे. या जलविद्युत
प्रकल्पातून देखील जवळपास ७००० कि. वॅट
विद्युत निर्माण होत असून याचा फायदा
जवळपास विदर्भाला झाला आहे.
------------------------------------------------------
(६) राज्यात इतरही काही जलविद्युत प्रकल्प
आहेत.  या प्रकल्पामध्ये सामान्यतः पुणे
जिल्ह्यातील भाटघर,  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील
तिलारी, ठाणे जिल्ह्यातील वैतरणा,अहमदनगर
जिल्ह्यातील भंडारदरा, सोलापूर जिल्ह्य़ातील
उजनी, तर कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी हे
जलविद्युत प्रकल्प असून याही जलविद्युताची
वीजनिर्मिती क्षमता अधिक समजली जाते.
=========================    
=========================

1 comment: