Pages

मायक्रोसॉफ्ट एक्सेल 2007 ची ओळख


        ┎════════════┒
        Ⅲ ▪ *संगणक ज्ञान*▪ Ⅲ
        ┗════════════┛
           
             
  💻 *मायक्रोसॉफ्ट एक्सेल 2007 ची ओळख*💻
    📼📼📼📼📼📼📼📼📼

• 💻 *मायक्रोसॉफ्ट एक्सेल हे एक अष्टपैलु सॉफ्टवेअर आहे. यामध्ये स्तंभ व कॉलम्स यांचे एकत्रीकरण करुन वर्कबुक तयार केलेले असतात. त्यांना स्प्रेडशीट असेही म्हणतात. एक्सेलमध्ये आपण कमीत कमी वेळेत वेगवेगळे फॉर्मुले वापरुन अधि़काधिक माहितीवर अचुक आकडेमोड करु शकतो. यात गणितीय आकडेमोड, खरेदी विक्री नोंदी, आर्थिक नोंदी ठेवुन त्या माहितीवर प्रक्रिया करुन चार्टस व आकृत्यांच्या स्वरूपात तो डेटा प्रेझेंट करु शकतो. उदा. एखाद्या शाळेतील विद्यार्थ्यांचे गुणपत्रक, कामगारांचे पगार पत्रक, वार्षिक नोंदी वगैरे गोष्टी एक्सलच्या सहाय्याने अचुक व चुटकीसरशी करु शकतो.*

• 💻 *एम. एस वर्ड प्रमाणेच एम. एस. एक्सेल मध्ये टायटल बार, क्विक अँक्सेस टुलबार, ऑफीस बटण, मिनिमाईज, मॅक्झीमाईज, क्लोज, टॅबस व रिबनचा समावेश होतो.*

• ⌨ *नेम बॉक्स (Name Box)* -⌨

•  *वर्कशीटच्या वरील भागात फॉर्मुलाबार शेजारी असणार्‍या बॉक्सला नेम बॉक्स असे म्हणतात. नेम बॉक्स हा अँक्टीव्ह असलेल्या सेलचा अँड्रेस दाखवतो. त्याचप्रमाणे एखाद्या सेलला किंवा सेलरेंज साठी दिलेले नाव दाखवितो.*

• ⌨ *फॉर्मुला बार (Formula Bar)* ⌨–

•  *या बारमध्ये सिलेक्ट केलेल्या सेलमधील मजकुर किंवा गणितीय सुत्र* *(Mathematical Formulas) दर्शविले जाते. त्याचप्रमाणे त्यात गरजेप्रमाणे बदल ही करता येतो.*

•⌨   *वर्कबुक* (Workbook)-⌨

*वर्कबुक हे स्तंभ (Columns) आणि ओळी (Row) यापासुन तयार झालेले असते. त्याचप्रमाणे एका वर्कबुक मध्ये मुळतः (Default) तीन Sheets शीट्स असतात. (उदा. Sheet1, Sheet2, Sheet3)*

•⌨   *स्तंभ* (Column)⌨

- *वर्कशीटमधील उभ्या ओळींना स्तंभ (Column) म्हणतात. एका शीटमध्ये एकुण 16384 स्तंभ (Column) असतात. या स्तंभाची नावे A,B,C….. याप्रमाणे असतात*.
 
*☵☵☵☵☵☵☵☵☵☵☵☵☵☵☵☵☵*

No comments:

Post a Comment