Pages

खनिजद्रव्य व त्याचे उपयोग


        ┎════════════┒
         ▌ *✺सामान्य माहिती✺*. ▌
        ┗════════════┛
           

*🔰खनिजद्रव्य व त्याचे उपयोग* 🔰

शरीरातील प्रक्रियेचे नियंत्रण व संरक्षण करण्याकरिता शरीराला खनिजाची गरज असते. आपल्या शरीराची निगा राखण्यामध्ये खालील खनिजे महत्वाचे आहेत.

🔷 *खनिज - फॉस्फरस*  -🔷

● *उपयोग*●
 - हाडे व स्नायू यांच्या संवर्धनासाठी ए.टी.पीची निर्मिती करण्याकरिता
● *अभावी होणारे परिणाम*●
- हाडे ठिसुळ होतात, चयापचय क्रियेत अडथळे निर्माण होतात
 ● *स्त्रोत* ●
- अन्नधान्ये, दुग्धजन्यपदार्थ मेथी, हिरव्या पालेभाज्या

🔷 *खनिज - पोटॅशियम*- 🔷

● *उपयोग*●
 - चेतापेशीच्या पोषणाकरिता
 अभावी होणारे परिणाम - चेतापेशीवर परिणाम होतो
 ● *स्त्रोत*●
 - सुकी फळे

🔷 *खनिज - कॅल्शियम-* 🔷

● *उपयोग*●
 - हाडे, दात, रक्त, मज्जातंतू व हृदय यांच्या पोषणाकरिता
 ● *अभावी होणारे परिणाम*●
 - हाडे कामकूवत व नरम होतात. कॅल्शियमच्या अभावी ऑस्टीओमॅलेशिया हा विकार होतो.
●   *स्त्रोत*●
- तीळ व पालेभाज्या

🔷 *खनिज - लोह*- 🔷

● *उपयोग*●
 - रक्त संवर्धन व हिमोग्लोबिनच्या पोषणाकरिता, ऑक्सीजन व हिमोग्लोबीन याचा संयोग घडवून आणते व प्रतिरोध संस्थेला मदत करते.
 ● *अभावी होणारे परिणाम*●
- लोहाच्या कमतरतेचा परिणाम हिमोग्लोबिनवर होतो. लोहाच्या अभावी रक्तक्षय व पंडूरोग होतो.
 ● *स्त्रोत*●
 - हिरव्या पालेभाज्या व मेथीची भाजी

🔷 *खनिज - तांबे-* 🔷

● *उपयोग*●
 - हिमोग्लोबिनचे संवर्धन करणे
● *अभावी होणारे परिणाम*●
 - तांब्याच्या आभावी हिमोग्लोबिनची निर्मिती होत नाही.
 ● *स्त्रोत*● - पालेभाज्या

🔷 *खनिज - सल्फर*-🔷

● *उपयोग*●
 - प्रथिनांची निर्मिती करणे अस्थी व नखे यांचे आरोग्य
●  *अभावी होणारे परिणाम*●
 - केस, हाडे कमकूवत होतात

🔷 *खनिज - फ्लोरिन-* 🔷

● *उपयोग*●
 - दातांचे रक्षण करण्याकरिता,
 ● *अभावी होणारे परिणाम*●
 - याच्या अभावी दंतक्षय होतो.

🔷 *खनिज - सोडीयम*- 🔷

● *उपयोग*●
- रक्तामधील आम्ल व अल्क यांचा समतोल साधला जातो.
 ● *अभावी होणारे परिणाम*●
 -  रक्तदाबावर परिणाम होतो.
 
🔷 *खनिज - आयोडीन*  - 🔷

● *उपयोग*●
- थायराईड ग्रथीच्या पोषणाकरिता
 ● *अभावी होणारे परिणाम*●
 - गलगंड नावाचा आजार होतो
⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸

No comments:

Post a Comment