Pages

संख्या व संख्याचे प्रकार

*🌎 !! संख्या व संख्याचे प्रकार !! 🌎.*• *समसंख्या* – ज्या संख्येला २ ने पूर्ण भाग जातो त्या संख्येला समसंख्या म्हणतात. समसंख्येच्या एककस्थानी ०,२,४,६,८, हे अंक येतात.
• *विषमसंख्या* – ज्या संख्येला २ ने पूर्ण भाग जात नाही त्या संख्येला विषम संख्या म्हणतात. विषमसंख्येच्या एककस्थायी १,३,५,७,९ हे अंक येतात.

*• संख्याचे प्राथमिक क्रियाविषयक नियम :-*

▪समसंख्या + समसंख्या = समसंख्या
▪समसंख्या - समसंख्या = समसंख्या
▪समसंख्या + विषमसंख्या = विषमसंख्या
▪समसंख्या - विषमसंख्या = विषमसंख्या
▪विषमसंख्या - विषमसंख्या = समसंख्या
▪विषमसंख्या + विषमसंख्या = समसंख्या
▪समसंख्या X समसंख्या = समसंख्या
▪समसंख्या X विषमसंख्या = समसंख्या
▪विषमसंख्या X विषमसंख्या = विषमसंख्या
▪मूळसंख्या – ज्या संख्येस फक्त त्याच संख्येने किंवा १ नेच पूर्ण भाग जातो त्या संख्येला मूळसंख्या म्हणतात.
उदा.- २, ३, ५, ७, ११, १३ इत्यादी.
१ ते १०० संख्याच्या दरम्यान एकूण २५ मूळसंख्या आहेत त्या खाली दिल्या आहेत
१ ते १०---------२, ३, ५, ७
११ ते २०---------११, १३, १७, १९
२१ ते ३०---------२३, २९
३१ ते ४०---------३१, ३७
४१ ते ५०---------४१, ४३, ४७
५१ ते ६०---------५३, ५९
६१ ते ७०---------६१, ६७
७१ ते ८०---------७१, ७३, ७९
८१ ते ९०---------८३, ८९
९१ ते १००---------९७


No comments:

Post a comment