Pages

रासायनिक क्रिया उलगडेल : संगणक


*📝विज्ञान जगत📝*

  ➖➖➖➖➖➖➖➖
*▪रासायनिक क्रिया उलगडेल:संगणक▪*

             रसायन शास्त्र ही एक अशी शाखा आहे, ज्यांच्या मूळे पदार्थ कशा पासून बनले आहेत?, त्याचे गुणधर्म काय आहेत?, रासायनिक अभिक्रियेतून कोणता नवीन पदार्थ तयार होतो?,त्याचे दैनिक जीवनात काय उपयोग आहेत?, असे अनेक प्रश्न उपस्थित होतात, आणि त्याचे उत्तरे रासायनशास्त्रातून मिळतात.रसायनशास्त्र समजण्यासाठी आमच्या जीवनाशी निगडित सर्वच गोष्टींचा उल्लेख उदाहरणासाठी आवश्यक वाटतो.
    जेवणाचा स्वाद त्याच्या वासा वरून व चविवरून जाणतो ते रसायन शास्त्र आहे. सकाळी झोपेतून उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत वापरात येणारी प्रत्येक वस्तू रासायनशास्त्राचाच अविष्कार आहे. टूथपेस्ट, साबण, शॅम्पू, प्लास्टिक बॉटल, स्वयंपाकाचा गॅस, आयोडीन नमक, पेन, शाई, कपड्यावरील मानभावक रंग, रात्री शांत झोप येण्यासाठी वापरातील polyurethinफोम गादी व उशी, एवढेच नव्हे तर दैनिक वापरातील प्रत्येक वस्तू ही रसायनशास्त्रातील देन आहे.
         परुंतु हे सर्व बनवण्यासाठी प्रयोग शाळेत रासायनिक अभिक्रिया पूर्ण करूनच कराव्या लागतात. काही रासायनिक अभिक्रिया इतक्या लवकर होतात की ,त्यातील काही निरीक्षणे आमच्या नजरेतून सुटतात. अश्या वेळी यातील प्रत्येक क्रियांची सूक्ष्म नोंद घेणे व त्याची निरीक्षणे नोंदवणे आता शक्य झाले आहे, ते ही शक्ती शाली संगणक प्रोग्राम द्वारा.
 ▪▪▪▪▪▪▪▪
*🌈रसायन शास्त्र▶संगणकातून🖥* 🔜🔜
    रसायन शास्त्रात अणू-रेणू मध्ये रासायनिक अभिक्रिया कश्या प्रकारे घडतात, व तयार जहालेल्या पदार्थ सजीवाच्या शरीरात इतर घटकांशी कसे रिऍक्ट करतात हे संगणकीय प्रोग्रॅम मधून स्पष्ट होते.
     हे संशोधन शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रात, आरोग्य शास्त्रात मैलाचा दगड बनला आहे.
🌈🌈✳⚜⚜🌈🌈✳
➖➖➖➖➖➖➖➖
Ⓜ🅰🅿Ⓜ🅰🅿Ⓜ🅰🅿
      मानवी शरीरातील DNA मधील सर्वच रासायनिक घटकात अनुवांशिक सुचना वहन करताना कोणता बदल होतो ते संगणकातून स्पष्ट होते.
     शास्त्रज्ञ सध्या शक्तिशाली प्रोग्राम बनवत आहेत. या माध्यमातून शरीरात घडणाऱ्या रासायनिक क्रियांचा पूर्वानुमान लावला जाऊ शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे औषधांची रचना, रासायनिक घटक, इत्यादींच वापर मानवी शरीरात किंवा वनस्पतीत कशा प्रकारे कार्य करेल यांचा अनुमान लावला जाऊ शकतो, व त्या नुसार औषधे बनवले जातात.
  म्हणून सध्ययुगात ,औषध निर्माण शास्त्रात एका पेक्षा एक सरस औषधे निर्माण होत आहेत व ते मानव तसेच वनस्पतीस उपयुक्त ठरत आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖
    *वरील रसायनशास्त्रातील संगणकीय संशोधना बद्दल 2013 साली, मार्टिन कार्लप्लेस,एरेह वरशेल, मायकेल लेवित , याना नोबेल पारितोषिक देण्यात आले*
▪▪▪⚜⚜▪▪▪
*✒संकलन,मराठी अनुवाद* *@गुरुदत्त पुरी,अंबाजोगाई@*

*विज्ञान प्रसार पुस्तकातून*
        *🙏साभार🙏*
Ⓜ🅰🅿Ⓜ🅰🅿Ⓜ🅰🅿

No comments:

Post a Comment