Pages

महाराष्ट्राच्या नैसर्गिक आणि राजकीय सीमा 

🌎 !! महाराष्ट्राच्या नैसर्गिक आणि राजकीय सीमा !! 🌎*


                       ● नैसर्गिक सीमा ●

महाराष्ट्राच्या वायव्येस सातमाळा डोंगररांगा, गाळण टेकड्या व सातपुडा पर्वतातील आक्रणी टेकड्या आहेत.
उत्तेरस सातपुडा पर्वत, त्याच्या पूर्वेस गाविलगड टेकड्या आहेत.
राज्याच्या ईशान्येस दरकेसा टेकड्या व पूर्वेस चिरोल टेकड्या आणि भामरागड डोंगर आहे.
राज्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र असून राज्याची किनारपट्टी उत्तरेकडील दमण गंगा नदीपासून दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत पसरलेली आहे.

                         ● राजकीय सीमा ●

महाराष्ट्राला एकूण ६ राज्यांच्या सीमा स्पर्श करतात. यापैकी सर्वाधिक लांब सीमा मध्यप्रदेश बरोबर असून सर्वात कमी सिमा गोवा या राज्याबरोबर आहे. तसेच दादरा नगर हवेली ह्या केंद्रशासित प्रदेशात सिमा लागते.

*राज्य दिशा - सिमेवरील जिल्हे - एकूण*
▪ गुजरात - वायव्य ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार - ४
▪ मध्यप्रदेश उत्तर - नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा व गोंदिया - ८
▪ छत्तीसगढ - पुर्व गोंदिया व गढचिरोली - २
▪ आंध्रप्रदेश - आग्नेय गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड - ४
▪ कर्नाटक - दक्षिण नांदेड, लातूर, उस्मानाबाद,सोलापूर, सांगली, कोल्हापूर,सिंधुदुर्ग - ७
▪ गोवा - दक्षिण सिंधुदुर्ग - १

▪ राज्याच्या वायव्येस असणारा केंद्रशासित प्रदेश – दादरा व नगरहवेली
▪ दोन राज्यांना संलग्न आसणारे जिल्हे - धुळे, नंदुरबार, गोंदिया, गडचिरोली, नांदेड, सिंधुदुर्ग


No comments:

Post a Comment