Pages

रक्ताचा रंग लाल का असतो ?


🌎 *रक्ताचा रंग लाल का असतो* ? 🌎मानवी रक्त ज्या पेशींपासून बनलेले असते, त्या पेशी लाल रंगाच्या असल्यामुळे मानवी किंवा इतर प्राण्यांच्या (माशांच्या काही जाती सोडून) रक्ताचा रंग लाल असतो. या पेशींना लाल रक्त पेशी (Red Blood Cells) असे म्हणतात. या पेशी लाल रंगाच्या असल्यामुळे त्यांना असे नाव पडले आहे. पण त्या पेशी लाल का असतात? किंवा लाल कशामुळे होतात?

लाल रक्त पेशी या विशिष्ट अशा प्रथिनांपासून बनलेल्या असतात. त्यांना ‘हिमोग्लोबिन (Hb)’ असे म्हणतात. संक्षिप्त रुपात यांना ‘Hb’ किंवा ‘Hgb’ असेही म्हणतात. प्रत्येक हिमोग्लोबिन हे अनेक उपभागांनी मिळून बनलेले असते, त्यांना ‘हिम्स’ (Hemes) असे म्हणतात. हे हिम्स लोहयुक्त धातूने बनलेले असतात. रक्त जेव्हा फुफ्फुसात जाते तेव्हा रक्तात ऑक्सिजन मिसळला जातो. जेव्हा ऑक्सिजन आणि लोह धातू एकत्र येतात तेव्हा त्यांच्यात रासायनिक अभिक्रिया घडून येते व लोहयुक्त धातूचा रंग लाल होतो. (जेव्हा लोह धातूचा ऑक्सिजनशी संबंध येवून लोह गंजण्याची क्रिया होते तेव्हासुद्धा लोह धातूचा रंग लालसर पडतो). रक्तातील लोह जेव्हा Deoxygeneted (ऑक्सिजन काढून घेण्याची क्रिया) होते, तेव्हा ते आणखीनच गडद लाल रंगाचे बनते. या कारणांमुळेच हिम्स लाल होते, हिम्समुळे हिमोग्लोबिन लाल रंगाचे होते व हिमोग्लोबिनमुळे आपले रक्त लाल रंगाचे दिसते.


No comments:

Post a comment