Pages

माउस


                                 *💻माउस💻*

• 📼की-बोर्ड सारखे माउस आवश्यक इतके नसले तरी विन्डोज़च्या जगात अतीशय उपयोगात पडणारे माउस हे इनपुट उपकरण आहे . माउस द्वारे अक्षरे किवा अंक टाइप करता येत नाहीत . माउस हे दर्शक उपकरण आहे . माउस जसा आपण हलवतो तसा माउसचा पाँटर हालातो . साधारण माउस ला ३ बटन असतात . आता सध्याच्या माउस मधे २ बटन असतात आणि स्क्रोल्लिंगसाठी व्हिल २ बटणाच्या मध्ये असते . माउस CPU च्या मागील भागाला जोडले असते . माउस सीरियल , युसबी तसेच वायरलेस पोअर्ट मध्ये उपलब्ध आहेत . माउसच्या मध्यमा मुळे ग्राफिक्स , डिजाईन , चित्र , आकृत्या काढने सहज शक्य होते . मिक्रोसॉफ्ट पैंट मध्ये माउस च्या सहाय्याने चित्र काढली जातात .

📼 *माउसचे ३ प्रकार आहेत.*📼

•① 📼 *मेंकेनिकल माउस*:-

• माउसचा हा सुरवातीचा प्रकार म्हणजेच ह्याच्या खालच्या भागाला एक लहानशी गोटी च्या आकाराचा बॉल असतो जो माउस सोबत फिरत असतो त्याची वायर CPU ला जोडली असत.

• ②📼 *ओप्टिकल माउस* :- ह्या माउस ला खालच्या भागाला गोटी नसते . माउस च्या बाहेर पडणारा प्रकाश माउसच्या हालचालीवर नियंत्रण ठेवतो .

•③📼  *कॉर्डलेस माउस* :-

•📼 अशा प्रकारचा माउस हा बटरी वर चालतो . CPU सोबत वायरलेस द्वारे चालतो . आशा माउस ला वायरलेस माउस देखिल म्हणतात .

•📼  *माउस साधारण खालील प्रकारच्या क्रिया करतो*.

१)☛ *क्लिक* :- माउस चे डावे बटन एकदा प्रेस करून लगेच सोडून देणे या क्रियेला क्लिक असे म्हणतात . एखादी गोष्ट क्लिक करून आपण निवडू शकतो .

२)☛ *डबल क्लिक* :- डावे बटन लागोपाठ दोनदा प्रेस करून सोडणे म्हणजे डबल क्लिक होय . एखादा प्रोग्रम्म , फाइल ओपन उघडण्यासाठी माउस मध्ये डबल क्लिक चा उपयोग करतात .

३)☛ *राईट क्लिक* :- माउस चे उजवे बटन एकदा प्रेस करून लगेच सोडून देणे या क्रियेला राईट क्लिक असे म्हणतात . एखादी गोष्ठी संदर्भातील सुचानांची यादी आपण पाहू शकतो स्क्रीन वर .
*☵☵☵☵☵☵☵☵☵☵☵☵☵☵☵☵☵*

No comments:

Post a comment