Pages

अंतराळ यात्री

🌎 !! अंतराळयात्री !! 🌎


अंतराळवीर हा अंतराळयान चालवणारा किंवा त्यामधून अवकाशप्रवास करणारा मनुष्य आहे.

राकेश शर्मा हे भारतातले पहिले अंतराळवीर होत. वायुसेनेत अनेक वर्षे सेवा केल्यावर त्यांना ही संधी मिळाली. जगातील पहिला अंतराळवीर होण्याचा मान रशियाकडे जातो. रशियाने सर्वप्रथम 'स्पुटनिक १' हा उपग्रह अंतराळात सोडून अंतराळयुगाची सुरुवात केली. त्यानंतर 'लायका' ही कुत्री अंतरिक्षात धाडून मानवाच्या अंतराळप्रवासाची खात्री करून घेतली. मग युरी गागारिन यांना रशियाने अंतराळात धाडून सुखरुपपणे पृथ्वीवर परत आणले.

▪ पहिला सजीव अंतराळवीर : लायका नावाच्ही कुत्री (रशिया)
▪ पहिला पुरुष अंतराळवीर : युरी गागारीन (रशिया)
▪ पहिली महिला अंतराळवीर : व्हेलेन्तिना तेरेश्कोव्हा (रशिया)
▪ चंद्रावर उतरणारा पहिला मानव : नील आर्मस्ट्राँग (अमेरिकेची संयुक्त संस्थाने)

●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
🌎 !! नील आर्मस्ट्राँग !!🌎


नील आर्मस्ट्राँग (ऑगस्ट ५, इ.स. १९३० - ऑगस्ट २५, इ.स. २०१२) हा एक अमेरिकन अंतराळयात्री, अंतरीक्ष अभियंता व लष्करी वैमानिक होता. आर्मस्ट्राँग हा चंद्रावर पाउल ठेवणारा जगातील पहिला मानव होता.

नासाचे अपोलो ११ हे अंतराळयान आर्मस्ट्राँगने २० जुलै, इ.स. १९६९ रोजी २०:१७:३९ यूटीसी ह्या वेळेला चंद्रावर उतरवले व त्यानंतर काही तासांत (२१ जुलै, १९६९, २:५६ यूटीसी) त्याने चंद्राच्या पृष्ठभागावर पहिले पाउल टाकले. आर्मस्ट्राँग हे दोन तास ३२ मिनिटे आणि आल्ड्रिन हे त्यांच्यापेक्षा १५ मिनिटे कमी काळ चंद्रावर होते. त्यांनी अमेरिकेचा ध्वज तिथे फडकावला. "ते मानवाचे एक छोटे पाऊल, सर्व मनुष्यजातीसाठी मोठी झेप आहे,' असे आर्मस्ट्राँग यांनी पृथ्वीवासीयांना रेडिओ संदेशाद्वारे सांगितले होते.


No comments:

Post a Comment