Pages

महाराष्ट्रातील प्रशासकीय आणि प्रादेशिक भाग

🌎 *महाराष्ट्रातील प्रशासकीय आणि प्रादेशिक भाग* 🌎


🔹 *प्रशासकीय विभाग-*

 ▪ *१.कोकण-*
 
         मुख्यालय : मुंबई
         समाविष्ठ जिल्हे(७) : पालघर, ठाणे, मुंबई नगर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग

 ▪ *२.पुणे-*

         मुख्यालय : पुणे
         समाविष्ठ जिल्हे(५) : पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर

 ▪ *३.नाशिक-*
   
         मुख्यालय : नाशिक
         समाविष्ट जिल्हे(५) : नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव

 ▪ *४.औरंगाबाद-*

         मुख्यालय : औरंगाबाद
         समाविष्ट जिल्हे(८) : औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, उस्मानाबाद

 ▪ *५.अमरावती-*
     
         मुख्यालय : अमरावती
         समाविष्ट जिल्हे(५) :अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशीम

 ▪ *६.नागपूर-*

         मुख्यालय : नागपूर
         समाविष्ट जिल्हे(६) : नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली

🔹 *प्रादेशिक भाग -*

 ▪ *१.कोकण -* सह्याद्री पर्वत अरबी समुद्राच्या दरम्यान पसरलेल्या अरुंद किनारपट्टी म्हणजेच कोकण .कोकण मध्ये एकूण ६ जिल्ह्यांचा समाविष्ट होतो.

 ▪ *२.देश -* सह्याद्रीच्या पूर्व बाजूला महाराष्ट्राचा देश हा प्रादेशिक विभाग आहे. या मध्ये एकूण ७ जिल्ह्यांचा समाविष्ट होतो.

 ▪ *३.घाटमाथा -* सह्याद्रीच्या पर्वताच्या उंचवटयाचा भाग घाटमाथा म्हणून ओळखला जातो.

 ▪ *४.मावळ -* सह्याद्रीच्या पूर्वेकडील उतरणीचा भाग मावळ प्रांत म्हणून ओळखला जातो .

 ▪ *५.खान्देश -* उत्तर महाराष्ट्रातील खोऱ्यातील धुळे नंदुरबार जळगाव या भागांना खान्देश असे म्हणतात.जमीन काळी असून कापूस व केली ही पिके प्रसिध्द आहेत.

 ▪ *६.मराठवाडा -* महाराष्ट्रातील गोदावरीच्या खोऱ्यास मराठवाडा असे म्हणतात.मराठवाड्यात एकूण ८ जिल्हे आहेत.

 ▪ *७.विदर्भ -* पूर्णा,वर्धा,पैनगंगा,वैनगंगा या नद्यांच्या खोऱ्यांच्या प्रदेशास विदर्भ व वऱ्हाड असे म्हणतात.तेथील जमीन सुपीक व काळी कसदार असून कापूस,संत्रा इत्यादी पिके येतात.

No comments:

Post a comment